dialbaramati

About Us

प्रिय मित्रांनो,

बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदरचा परिसर हा इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. त्याखेरीज पुणे जिल्ह्यातील वेगाने विकसित होणारा परिसर म्हणून या तालुक्यांकडे पाहिले जाते. महानगराकडे वाटचाल करणाऱ्या या परिसरामध्ये डायल बारामती सारख्या प्रकल्पाची गरज वाटत होती. आपल्या सर्वांना या प्रकल्पाच्या माध्यमातून योग्य ती माहिती मिळत राहील आणि आपल्या वेळेची व पैशाची यातून बचत होईल अशी खात्री आहे. या परिसराच्या वेगवान विकासाला या प्रकल्पाचाही हातभार निश्चितपणे लागेल.

हा प्रकल्प नेमका आहे तरी काय ?

बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुकयातील सर्व व्यावसायिकांची माहिती एकत्रित करणे आणि गरजेच्या वेळी ही माहिती त्वरीत उपलब्ध करून देणारा डायल बारामती हा प्रकल्प आहे. यातून आपल्याला ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी अचूक माहितीचा साठा उपलब्ध असेल. या प्रकल्पाच्या विविध माध्यमातून आपणास हवी ती माहिती त्वरीत उपलब्ध होऊ शकते. मात्र यासाठी या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली सक्रीय साथ आम्हाला हवी आहे.

या प्रकल्पाची वैशिष्ठे -

 

1. व्यावसायिक संपर्क पुस्तिका – प्रत्येक तालुक्याच्या तसेच महत्वाच्या गावातील सर्व प्रकारचे व्यवसाय तसेच प्रशासन, राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच संस्थांची माहिती फोन तसेच मोबाईलनंबरसह या संपर्कपुस्तिकेमध्ये असेल.

2. वेबसाईट – या प्रकल्पाची स्वतंत्र वेबसाईट असेल. या वेबसाईटवरून परिसरातील कोणतीही व्यावसायिक स्वरुपाची माहिती आपणास मिळू शकेल. ईमेल करूनही आपण आवश्यक ती माहिती मिळवू शकता.

3. फोनवरून संपर्क – या प्रकल्पाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या फोननंबरवर संपर्क करून आपण आवश्यक ती माहिती मिळवू शकता.

 

या माहितीचा आपल्याला काय उपयोग होईल ?

अगदी साधं उदाहरण, आपल्या घरातील नळाची तोटी गळत आहे आणि ती बदलायची आहे. वरीलपैकी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करून आपण आपल्या परिसरात प्लंबरचे काम करणाऱ्या व्यक्तींचे संपर्क नंबर मिळवू शकता आणि त्यांच्याशी संपर्क करू शकता.

असाच उपयोग आपल्याला प्रत्येक क्षेत्रात होऊ शकतो. शिक्षण, नोकरी, विवाह, प्रॉपर्टी खरेदी विक्री, कोणत्याही प्रकारची व्यावसायिक खरेदीविक्री अशा प्रत्येक ठिकाणी आपणास आवश्यक माहिती या प्रकल्पातून मिळू शकते. याचा उपयोग आपल्या फायद्याचा निर्णय घेण्यासाठी आपणास होऊ शकतो.

एक व्यावसायिक म्हणून आपण एकाचवेळी ग्राहकही असतो आणि विक्री करणाराही असतो.

 

यात आपल्या दोन्ही भुमिकामध्ये कसा फायदा होईल

1. ग्राहक – आपणास वस्तू खरेदी करायची आहे किंवा सेवा घ्यायची आहे. आज आपल्यापुढे ठराविकच पर्याय आहेत. कारण बाजारपेठेत सदर वस्तू किंवा सेवा देणारे किती विक्रेते आहेत याची माहिती आपल्याकडे नाही. किंवा अशी संपूर्ण माहिती मिळविण्यासाठीचा वेळ व पैसा आपल्याकडे नाही. अशा वेळेस आपण या प्रकल्पाच्या वेबसाईटवरुन किंवा फोनद्वारे वरील वस्तू व सेवा देणाऱ्यांची संपूर्ण यादी मागवू शकता. त्यांच्याशी बसल्याजागी चर्चा करून त्यातील तुमच्या दृष्टीने सर्वोत्तम वस्तू वाजवी भावात मिळवू शकता.

2. विक्रेता – आता आपल्याला आपली वस्तू किंवा सेवा विकायची आहे. आता यासाठी ग्राहकांचा शोध घेण्याचे मर्यादीत पर्याय आपल्याकडे आहेत. मात्र आमच्या वेबसाईटवर आपल्या व्यवसायाची माहिती आहे. ग्राहक या वस्तू किंवा सेवांची माहिती घेण्यासाठी आम्हाला फोन करतील अथवा वेबसाईट पाहतील. त्यावेळी आपला संपर्कनंबर घेऊन ते आपल्याला संपर्क करू शकतात. यातून प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत थेट पोहचण्याचे हे अत्यंत कमी खर्चातील साधन आपल्याला मिळालेले आहे.

 

 

 

700 total views, 1 views today

Copyright 2014,Dial Baramati .